चारठाणा येथे दाम्पत्यास मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


Beating couple in Charthana : Crime against three मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाणा येथे महिला फोनवर मुलाशी बोलत असताना संशयितांनी आपल्याबाबत बोलत असल्याचा समज करीत महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली. ही घटना 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
तुकाराम तोताराम पाटील (67, चारठाणा) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पत्नी अलकाबाई या 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता या मुलगा रमेशशी बोलत असताना संशयितांनी आपल्याविषयी काही तरी बोलत असल्याचा समज करून घेत तक्रारदारासह त्यांच्या पत्नीला शिविगाळ चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तक्रारदाराचा डावा हात फ्रॅक्चर केला. या प्रकरणी रमेश सुखलाल मोहिते, पंचफुलाबाई सुखलाल मोहिते व आशाबाई हरसिंग बेलदार (सर्व रा.चारठाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विनोद लक्ष्मण सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !