तरुणांनो महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घ्या
खंजिरीवादक पंकजपाल राठोड : वरणगावात कीर्तनातून समाजप्रबोधन
भुसावळ : महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर नाही तर त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे आवाहन खंजिरी वादक पंकजपाल राठोड (वाशिम) यांनी येथील तालुक्यातील वरणगाव येथील गांधी चौकात आयोजित कीर्तनात केले. माळी समाज युवा संघटनेच्या वतीने आयोजित महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. कीर्तनात चौफेर फटकेबाजी करीत पंकजपाल राठोड यांनी उपस्थितांना शेवटपर्यंत लोटपोट करीत थोर महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याचे आवाहन केले. सुरुवातीला संत सावता महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन माळी समाज अध्यक्ष संजय माळी, सहकारमित्र चंद्रकांत बढे सर, माळी समाज युवा संघटना अध्यक्ष बाळा माळी, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी, शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समाधान चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, युवकचे योगेश पाटील, माळी समाज पंच गणेश माळी, शिरू माळी, विजय सोनवणे, शशी चौधरी, संदीप वाघ, श्रीकांत माळी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
गांधी चौक भागात झालेल्या पंकज पाल महाराज यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाला महिला, पुरुष, तरुण, राजकीय सामाजिक शेत्रातील नागरिक मोठया संखेने उपस्तिथ होते. हा कार्यक्रम माळी समाज युवा संघटना आणि माळी समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी युवा अध्यक्ष पंकज माळी (बाळा), उपाध्यक्ष अतुल माळी, सचिव किरण माळी, महेश माळी, मयुर माळी, रीतेश माळी, निखील माळी, चेतन माळी यांचासह माळी समाजातील युवक तरुणांनी आणि समाजबांधवांनी परीश्रम घेतले.
