वीज चोरी : वाघोदा बुद्रुक येथील दोघांविरोधात गुन्हा
यावल : रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे वीज चोरी केल्यानंतरही दंड भरण्यास नकार देणार्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने गुन्हा
वाघोदा बुद्रुक, ता.रावेर येथे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता प्रसन्ना सुभाष सोळुंके यांनी आपल्या पथकासह गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवली. गावातील हरी लक्ष्मण महाजन व महबूब रुबाब तडवी हे दोघे वीज चोरी करतांना आढळल्याने दोघांना चोरी केलेल्या वीज युनिट प्रमाणे दंडाची रक्कम आकारून नोटीस बजविण्यात आली मात्र वेळीच दंड भरण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र त्यांनी दंड भरला नाही म्हणून या दोघाविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
