सावदा शहरातील 75 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
A 75-year-old man committed suicide by hanging himself in Savada city सावदा : शहरातील 75 वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उखर्डू लालू सरोदे (75, तेलीवाडा, सावदा, ता.रावेर) असे मृत वृध्दाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
उखर्डू सरोदे हे आपल्या परीवारासह वास्तव्याला होते. बुधवार, 12 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करीत तो शवविच्छेदनासाठी हलवला. सावदा पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंडे असा परीवार आहे.
