मुक्ताईनगरात मोलकरणीची हात की सफाई ; 48 हजार लांबवले


जळगाव : मुक्ताईनगरातील गट क्र.32 मध्ये सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भगवान विश्राम पाटील (58) यांच्या घरातून मोलकरीण असलेल्या कल्पना मिस्तरी यांनी तिजोरीच्या चावीसह 48 हजारांची रोकड लांबवल्याची घटना नुकतीच घडली. शुक्रवारी सकाळी भगवान पाटील गॅलरीत मोबाईल बोलत असताना त्यांच्या पत्नी स्नानगृहात असताना मोलकरीण कल्पना या काम करीत असताना त्यांनी अलगद शोकेसमध्ये ठेवलेली तिजोरीची चाबी लांबवून तिजोरीतील 48 हजारांची रोकड लांबवल्याचा आरोप आहे शिवाय 70 हजारांची रोकड तिजोरीत मात्र तशीच ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. घरात कुणीही आले नसताना मोलकरणीनेच चोरी केल्याचा संशय पाटील भगवान पाटील यांनी व्यक्त करीत तसा पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे.


कॉपी करू नका.