शिरसाड येथे वीज चोरी : पाच जणांविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील साकळी येथील विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शिरसाड या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये गावात पाच जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना चोरी केलेल्या युनिटनुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी वेळेत दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दंड न भरल्याने गुन्हा
साकळी, ता.यावल येथील विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता निलेश महाजन सहपथकाने शिरसाड या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. या मोहिमेमध्ये सीताराम ओमकार सपकाळे, पांडुरंग नारायण धनगर, चंद्रकांत प्रेमचंद राजपूत, अशोक रामराव चर्हाटे व राजेंद्र सोमा भालेराव हे पाच जण वीज चोरी करतांना आढळले. संबंधिताना दंडाची नोटीस देवूनही त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधता यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता निलेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.
