चुंचाळे शेतशिवारात मक्याच्या शेतात शॉर्टसर्किटने आग : दिड लाखांचे नुकसान


यावल : तालुक्यातील चुंचाळे शेत शिवारामध्ये विद्युत शॉर्टसर्किटने मक्याच्या पिकाला आग लागली. या आगीत दोन हेक्टर वरील उत्पादन काढणीस आलेला मका जळून शेतकर्‍याचे दीड लाखाचे नुकसान झाले.

वीज कंपनीने भरपाई देण्याची मागणी
चुंचाळे, ता. यावल या गावातील रहिवासी सखुबाई नथ्थु पाटील यांचे चुंचाळे शेत शिवारात गट क्रमांक तीनमध्ये शेती आहे. या शेतात दोन हेक्टर क्षेत्रावर त्यांनी मक्याची लागवड केली व आता मका उत्पादन काढण्या योग्य झाला असताना या शेतात अचानक विद्युत वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉट सर्किटमुळे उभ्या पिकाला आग लागली. हा प्रकार निर्दशनास आल्यावर शेतकर्‍यांनी शेतात धाव घेतली मात्र आगीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या आगीमुळे शेतकर्‍याचे दिड लाखांचे नुकसान झाले. राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकर्‍याला भरपाई देण्याची मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !