अकलूदमधील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ : पतीसह सासूविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील अकलूद येथील माहेर असलेल्या 34 वर्षीय विवाहितेचा चारचाकी वाहन आणि सोन्याची चैन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने दोघांनी छळ केला. विवाहितेला मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
अकलूद, ता.यावल येथील माहेर असलेल्या अनिता कमलेश सामुद्रे (34) या विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह कमलेश आप्पा सामुद्रे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती कमलेश आप्पा सामुद्रे व सासू शकुंतला आप्पा सामुद्रे (दोन्ही रा.माऊली नगर, श्री स्वामीनारायण मंदिराजवळ, भुसावळ) यांनी माहेरून फोर व्हीलर व सोन्याची चैन घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला व तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन शिविगाळ करीत मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळू भोई करीत आहे.
