आधी पोलीस महासंचालक पदकाने गौरव : नाशिकमधील निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल होताच नियंत्रण कक्षात उचलबांगडी


Inspector of Police honored with Director General Medal ; Within five days, the control was transferred and a case was registered नाशिक : पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दखल घेत अलीकडेच महाराष्ट्र दिनी नाशिक उपनगरचे वरीष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांना पालकमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांचे पद देवून गौरवले मात्र त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आल्याने पोलीस वर्तूळात खळबळ उडाली. शुक्रवार, 6 मे रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापुर पोलीस ठाण्यातील निरीक्षक माईनकर यांच्यावर आपल्या पदाचा दुरूपयोग करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पैशांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने नाशिकच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
2016 सालच्या एका फसवणूक प्रकरणात महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-2कडे होता व या युनिटचा प्रभारी पदभार तेव्हा माईनकर यांच्याकडे होता. या प्रकरणात संशयित माईनकर यांनी फिर्यादी महिलेकडे वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा फिर्यादीने न्यायालयात केला. न्यायालयाने गंगापुर पोलिसांना आदेशित करत माईनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षात उचलबांगडी
माईनकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तर उपनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांचा प्रभारी पदभार आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक शरमाळे यांच्याकडे सोपविण्यात आला. माईनकर यांच्याविरूद्ध दाखल गुन्ह्याचा तपास सहा.पोलीस आयुक्त डॉ.सिद्धेश्वर धुमाळ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !