चाळीसगावातील संत रोहिदास सोसायटीत धाडसी घरफोडी : दिड लाखांचा ऐवज लांबवला
Daring burglary in Sant Rohidas Society in Chalisgaon: compensation of half a lakh extended चाळीसगाव : शहरातील भडगाव रोडवरील कापड मिल समोरील संत रोहिदास सोसायटीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत एक लाख 58 हजारांचा ऐवज लांबवला. ही चोरी 6 मे रोजी पहाटे 4 ते 6.30 वाजेच्या दरम्यान झाली. या चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पहाटेच्या सुमारास चोरी
छायाचित्रकार सुनील राघो बोरसे हे कुटुंबासह संत रोहिदास सोसायटी, कापड मिलसमोर, भडगाव रोड चाळीसगाव येथे राहतात. शुक्रवार, 5 रोजी रात्री 9.30 वाजता कुटुंब जेवण करून गप्पागोष्टी करून झोपी गेले. पहाटे चार वाजेच्या सुमारास सुनील बोरसे यांच्या आई घराच्या वरच्या हॉलचा दरवाजा उघडून बाथरूममध्ये गेल्या. बाथरूमधून बाहेर आल्यानंतर हॉलचा दरवाजा ढकलून त्या झोपी गेल्या व सकाळी साडे सहा वाजता त्या उठल्या असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
चोरीने उडाली खळबळ
नाशिक येथून बहिणीकडून आणलेले व पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिणे, रोख पाच हजार रुपये व मोबाईल असा ऐवज असलेली पर्स दिसून आली नाही. पर्सचा आसपास शोध घेतला परंतु मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या वरच्या हॉलचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून पर्समध्ये ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, 70 हजार रुपये किंमतीचा दोन तोळ्याचा सोन्याचा हार, रोख पाच हजार रूपये, पाच हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व आठ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा सुमारे एक लाख 58 हजार रुपये किंमतीचा लबाडीच्या इराद्याने चोरून नेला. याप्रकरणी सुनील राघो बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील आव्हाड करीत आहेत.


