जळगावातून दररोज दुचाकींची चोरी तरीही पोलिसांकडून कारवाई शून्यच : आता तर महापालिकेतूनच लांबवली दुचाकी
The bike of the municipal employee in Jalgaon was extended जळगाव : जळगाव शहरातून दररोज किमान दोन ते चार दुचाकींच्या चोर्या होत असतानाही पोलिसांची एकूणच भूमिका आलबेल असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची भावना आहे. दुचाकी चोरट्यांनी शहरात ठिय्या मांडला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहरातील महापालिकेच्या पार्किंगमधून महापालिका कर्मचार्याची दुचाकी लांबवली. या प्रकरणी शनिवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील हरेश्वर नगरातील संजय अनंत वैद्य हे महापालिकेत नोकरीला आहेत.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
बुधवार, 3 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संजय वैद्य यांनी त्यांची दुचाकी (एम.एच. 19 बी.टी. 9433) ही महापालिकेच्या पार्किंगमध्ये उभी केली. काम आटोपून दुपारी दोन वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


