घरी कुणी नसताना अल्पवयीन मुलीला पळवले : अमळनेरातील प्रकार
Abduction of a minor girl in Amalner city अमळनेर : अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण करून तिला पळवून नेल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शनिवारी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फूस लावून पळवले
अमळनेर शहरातील एका भागात पीडीता आपल्या परीवारासह वास्तव्यास होती मात्र तिच्या अज्ञानाचा फायदा घेत अनोळखी संशयीताने तिला काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार गुरुवारी दुपारी दोन ते साडेतीन दरम्यान घडला. पीडीतेच्या वडिलांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.


