तरुणीशी अश्लील वर्तन करीत विनयभंग ; ठार मारण्याचीही धमकी


19-year-old girl molested in Lihatanda जामनेर : तालुक्यातील लिहातांडा येथे 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग करीत संशयिताने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शनिवारी पहूर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर रंगलाल चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा
जामनेर तालुक्यातील लिहातांडा येथे 19 वर्षीय तरुणी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 5 मे रोजी सायंकाळी तरुणी ही घरी असतांना गावातील ज्ञानेश्वर अनिल चव्हाण याने तरुणीचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच विरोध केल्यावर संशयिताने तरुणीला शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडीत तरुणीने पहूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी ज्ञानेश्वर अनिल चव्हाण याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत विरणारे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !