जळगावात घरफोडी पूर्वीच चौघे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Four in Jalgaon house burglary already in MIDC police net जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी करण्यापूर्वी चौघा संशयितांच्या मुसक्या बांधल्या आहेत. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परीसर आणि अयोध्या नगर परीसरात रविवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अटकेतील दोघे हद्दपार असून आदेशाचे उल्लंघण केल्याने त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सोनूसिंग रमेश राठोड (23), प्रशांत उर्फ चोरबाप्या पुंडलिक साबळे (28, दोन्ही रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) , समीर शेख फिरोज शेख (21, रा.फातीमा नगर) आणि समीर खान अफसर खान (18, रा.मेहरूण, जळगाव) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परीसरात आणि अयोध्या नगर परीसरात चोरीच्या उद्देशाने काही संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर सोनूसिंग राठोड, प्रशांत साबळे, समीर शेख फिरोज शेख आणि समीर खान अफसर खान या चौघांना अटक करण्यात आली तर चौघांनी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती दिली. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक विकास सातदिवे, मुदस्सर काझी, पोलीस कॉन्स्टेबल ललित नारखेडे, किरण पाटील, सतीश गर्जे आदींच्या पथकाने केली.


