टिकेची झोड उठताच जळगाव तालुका पोलिसांना कारवाईची जाग : वाळूचे ट्रॅक्टर जप्त
Jalgaon taluka police sprung into action as soon as ticks started: sand tractor seized जळगाव : आव्हाणेत वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पेटवल्याचा प्रकार घडल्यानंतर संतप्त जनमाणसातून पोलीस व महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सात वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारातील गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असताना मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास कोतवाल किशोर शालिग्राम चौधरी यांनी धडक कारवाई करत विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. ट्रॅक्टर चालक रऊफ शेख यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. या प्रकरणी कोतवाल किशोर शाळीग्राम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मालक शेख रऊफ शेख (आव्हाणे, ता.जळगाव) याच्या विरोधात सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहे.


