चाळीसगाव तालुक्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


A woman’s dead body was found in Chalisgaon taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारात एका स्त्री जातीचा बेवारस मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. मयत महिला ही वेडसर असल्याचा संशय असून नैसर्गिकरीत्या तिचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
हिरापूर शिवारातील एका शेतकर्‍याच्या शेतात अंदाजे 35 ते 40 वयोगटातील स्त्री जातीचा मृतदेह बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आढळला. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह कुजल्याने जागीच शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !