रावेर तालुक्यातील गुन्हेगारांचे त्रिकूट जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार
A trio of criminals from Raver taluka banished from the district for two years भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणारे तसेच वारंवार गुन्हे करून जनतेच्या मनात भीती निर्माण करणार्या रावेर तालुक्यातील तिघांच्या टोळीस जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईरफान हबीब तडवी (21), जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (20) व शब्बीर रमजान तडवी (22, तिन्ही रा.पिंप्री, ता.रावेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
दोन वर्षांसाठी गुन्हेगारांना जळगाव जिल्हा बंदी
टोळी प्रमुख ईरफान तडवीसह तिघांविरोधात चोरी केल्याप्रकरणी रावेर पोलिसात तीन गुन्हे दाखल असून संशयित टोळीने राहून वारंवार गुन्हे करीत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत रावेर पोलिसांनी प्रस्ताव सादर केल्याने फैजपूर उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी प्रस्तावाची चौकशी करून तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. जिल्हा पोली अधीक्षकांनी तिघांना मुंबई पोलीस कायदा कलम 55 दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
