जळगावातील 35 वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार : विखरणच्या तरुणाविरोधात गुन्हा


A 35-year-old girl in Jalgaon was assaulted with the lure of marriage : A crime against the youth of Vikharan एरंडोल :  जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून एरंडोल-जळगाव महामार्गावरील एक फार्म हाऊसवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विखरण, ता.एरंडोल उदयसिंग अंकुश मारुती महाजन (माळी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सलग तीन वर्ष अत्याचार केल्याचा आरोप
जळगावातील एका भागातील 35 वर्षीय तरुणीच्या दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित अंकुश महाजन याने मार्च 2020 ते 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून एरंडोल-जळगाव महामार्गावरील एका फार्म हाऊसवर दुचाकीवर नेत वारंवार अत्याचार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने एरंडोल पोलिसात पीडीतेने धाव घेत तक्रार दिल्यानंतर बलात्कारासह अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !