Horrible accident in Pachora City पाचोरा शहरात भीषण अपघात : पिकअपच्या धडकेने दोघांचे पाय निकामी तर अन्य दोघे गंभीर

दोघांचे पाय निकामी : बुलढाण्यातील पिकअप चालकाला अटक


Horrible accident in Pachora City : Two lost their legs while two others were seriously injured after being hit by a pick-up पाचोरा : सफरचंदाची वाहतूक करणार्‍या भरधाव महेंद्रा पिकअपने शहरातील महाराणा प्रताप चौकात चौघांना उडवल्याने दोघांचे पाय निकामी झाले तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताने शहरात मोठी खळबळ उडाली असून पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे. अपघातात वाहनाची धडक इतकी जोरदार होती की एका दुचाकीसह महेंद्रा बोलेरो पिकअपचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा होवून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भीषण अपघातात चौघे जखमी
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईहून भडगावमार्गे बुलढाण्याकडे भरधाव चालक श्रावण रतनसिंग घोती (23, बुलढाणा) हा सफरचंद आदी फळे घेवून पिकअप (क्रमांक एम.एच.48 बी.एम.7943) ने भरधाव वेगाने निघाला असताना पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात नियंत्रण सुटल्याने श्री दत्त मंदिरासमोरील ओट्यावर बसलेल्या चौघांच्या अंगावर जावून वाहन धडकल्याने दोघांचे पाच गुडख्यापासून निखळले तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात एका दुचाकीचा चुराडा झाला असून महेंद्रा बोलेरोचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला.

सुरतच्या प्रवाशासह चौघे गंभीर
या भीषण अपघातात वसंत भाईदास पाटील (42, सुरत), विनोद बारकू पाटील (50, रा.पाचोरा), अमोल वाघ (27, रा.पाचोरा) व कुंदन सुनीलसिंग परदेशी (17, रा.पुनगाव ता., पाचोरा) गंभीर जखमी झाले. बोलेरोच्या जोरदार धडकेत वसंत पाटील व विनोद पाटील यांचे गुडघ्यापासुन दोन्ही पाय निकामी झाले तर उर्वरीत दोघे जखमी झाले. विशेष म्हणजे वसंत पाटील हे नातेवाईकांच्या लग्नासाठी सुरत येथून खाजगी ट्रॅव्हल्सने पाचोरा येथे आले होते व मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या लोकांना ते लग्नस्थळाचा पत्ता विचारत असतानाच भीषण अपघातात त्यांचे पाय निकामी झाले. विनोद पाटील हे घरातील एकमेव कमावते असल्याने व प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असल्याने वाळू वाहतूकदार तरुणांनी त्यांच्या उपचारासाठी पैसे जमा केले.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळताच पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, राहुल बेहरे, राष्ट्रवादीचे प्रकाश भोसले, प्रा.सी.एन.चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांच्यासह सहकार्‍यांनी जखमींना तत्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघाताची माहिती घेत पिकअप चालकाला अटक केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !