हळद कार्यक्रमातील वादानंतर कुसूंब्यात घरावर दगडफेक करीत धमकावले


जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात पुतण्यामुळे वाद झाल्याचा राग मनात ठेवून 15 ते 20 जणांनी जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील काकांच्या घरावर दगडफेक करीत घरात घुसून तलवार व चॉपरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. यया प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 20 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

20 संशयितांविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे पंडीत शेनफडू कोळी (43) हे वास्तव्यास आहेत. पंडीत कोळी यांचा पुतण्या गणेश कोळी याच्यामुळे सोमवार. 8 मे रोजी हळदीच्या कार्यक्रमात वाद झाल्याचा गैरसमज तसेच राग मनात ठेवून मंगळवार, 9 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जैनाबाद येथील पंधरा नावाच्या ग्रुपचेधिीरज कोळी, छोटू कोळी, अतुल पाटील यांच्यासह 15 ते 20 जण पंडीत कोळी यांच्या घरी आले, त्यांनी पंडीत कोळी यांच्या घरावर दगडफेक केली तसेच घरात घुसून तलवार व चॉपरचा धाक दाखवून शिवीगाळ करत तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी पंडीत कोळी यांना दिली. याचदरम्यान संबंधितांनी पंडीत कोळी यांचा पुतण्या गणेश कोळी यास फोनवरुन गावात येवून मारण्याची धमकी सुध्दा दिली. याबाबत पंडीत कोळी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर धीरज कोळी, छोटू कोळी, अतुल पाटील यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक अंनिस शेख करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !