ग्राहक सेवा केंद्रातून पावणेतीन लाखांची रोकड लांबवली : चाळीसगावात खळबळ
Cash of 3 Lakhs extended from Customer Service Center : Excitement in Chalisgaon चाळीसगाव : शहरातील हिरापूर रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र फोडून सुमारे दोन लाख 68 हजार 920 रूपयांची रोकड लांबवण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळ आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शटर उचकावून चोरी
ज्ञानेश्वर श्रावण चौधरी (34, करगाव रोड) यांचे हिरापूर रोडवर बँक ऑफ इंडीयाचे ग्राहक सेवा केंद्र आहे. बुधवार, 10 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तोंडाला मास्क लावलेल्या चोरट्यांनी ग्राहक सेवा केंद्राचे शटर वाकवून चोरी केली. सीसीटीव्हीत तोंडाला मास्क लावलेले दोन इसम ग्राहक सेवा केंद्राचे लोखंडी शटरचा सेंटर लॉक उचकवतांना दिसून आले. या प्रकरणी ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा भामट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली. अत्यंत वर्दळीच्या भागात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


