रावेर शहरातील विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू


रावेर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रहिवासी नम्रता दिनेश चौधरी (39) या विवाहितेचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नम्रता चौधरी हे शुक्रवारी वरणगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या व दुपारी कार्यक्रम आटोपल्यानंतर माहेरी वरणगावात गेल्यानंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या व दवाखान्यात उपचारार्थ हलवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. नम्रता यांचा उष्माघाताने मृत्यू झालाचा अंदाज आहे. त्या केबल नेटवर्क व्यावसायीक दिनेश नत्थू चौधरी यांच्या पत्नी होत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !