फैजपूर शहरात चित्रपट गृहावर उपद्रवींची दगडफेक


In the city of Faizpur, miscreants pelted stones at a movie house फैजपूर : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला देशभरात वाढता प्रतिसाद मिळत असून शहरातील श्रीराम थिएटरमध्येही त्याचे प्रसारण सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी दोन वाजता काही उपद्रवींनी चित्रपटाच्या पाठीमागून बाजूने पत्र्यांवर दगडफेक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही वार्ता सुभाष चौकात धडकल्यानंतर व्यावसायीकांनी पटापट दुकाने बंद केली तर पोलिसांना माहिती कळताच सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर व सहकार्‍यांनी धाव घेत गर्दी पांगवली.

अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी सुमारे 40 उपद्रवींवर फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चित्रपट गृहाचे चालक विक्की प्रकाश आठवणी यांनी या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, सिद्धेश्वर आखेगावकर व ग्रामस्थांनी फैजपूर शहरवासीयांना शांततेचे आवाहन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !