Bhusawal is the most hot in the State राज्यात सर्वाधिक हॉट भुसावळच ! पारा पोहोचला 45.7 अंशावर

यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद : वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव


Bhusawal is the most hot in the State ! The Mercury Reached 45.7 Degrees भुसावळ : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा वादळाने वातावरणात बाष्प शोषून घेतल्यानंतर भुसावळसह जिल्ह्यात वैशाख वणवा पेटल्याची अनुभूती येत आहे. राज्यात सर्वाधिक हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळात शुक्रवारी यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची अर्थात 45.7 अंश तापमानाची नोंद शुक्रवारी केंद्रीय जल आयोग कार्यालयाने नोंदवली आहे. भुसावळप्रमाणे जळगावसह अन्य तालुक्यांमध्ये शुक्रवारी तापमानाचा पारा 45 अंशावर राहिल्याची माहिती हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी दिली. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

वैशाख वणवा पेटल्याने जनजीवन प्रभावीत
भुसावळ शहराच्या तापमानात दररोज वाढ होत असून बुधवारी शहराचे कमाल तापमान 44.8 अंशांवर गेल्यानंतर गुरुवारी ते 44.9 अंशावर पोहोचले तर शुक्रवारी पुन्हा तापमान तब्बल 45.7 अंशावर गेल्याची नोंद शहरातील केंद्रीय जल आयोग केंद्रात करण्यात आली आहे. उष्णतेचा तडाखा वाढल्याने भुसावळसह जिल्ह्यात जनजीवन प्रभावीत झाले आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, महामार्ग दुपारी निर्मनुष्य होत आहेत तर बाजारपेठेतील ग्राहकांची संख्याही कमी झाल्याने व्यवसायांवर परीणाम होत आहे. वैशाख वणवा पेटल्याची अनुभूती नागरीकांना येत आहे. बंगालच्या उपसागरातील मोचा वादळाच्या परीणामाने तापमानात वाढ होत आहे. 13 मे पर्यंत तापमानात उच्चांकी वाढ राहिल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

सर्वच तालुक्यात 45 अंशावर तापमान
वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी भुसावळसह वरणगाव व जळगाव, चोपडा 45.8 तर अमळनेर 45.4, बोदवड 44.9, चाळीसगाव 44.6, धरणगाव 45.7, एरंडोल 45.6, फैजपूर 45.1, जामनेर 45.5, मुक्ताईनगर व रावेर, भडगाव 45.2, पारोळा 44.8, पाचोरा व यावलचे तापमान 45.4 अंश राहिले. 13 मे पर्यंत तापमान कायम राहणार असून त्यानंतर काही अंशी त्यात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !