अज्ञात वाहनाच्या धडकेत म्हैसवाडीतील तरुणाचा मृत्यू
यावल : बहिणीला भेटण्यासाठी जाणार्या म्हैसवाडीतील तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात यावल-फैजपूर मार्गावरील रस्त्यावरील सांगवी-हिंगोणा दरम्यान शुक्रवारी रात्री घडला. भीमराव बाळु पांडव (35, म्हैसवाडी, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू
भीमराव हा तरुण दुचाकी (एम.एच.19 ई.बी.4791) व्दारे सांगवी गावात आपल्या सासरवाडीला आला व तेथून तो मारूळ येथील बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीने जात असताना शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास सांगवी ते हिंगोणा गावाच्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातांतन ग्रामस्थांनी भीमराव यास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. मयत भीमराव पांडव यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन लहान मुली, मुलगा आहे.
