धरणगाव तालुक्यातील महिलेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
धरणगाव : तालुक्यातील एका गावात अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
शुक्रवार, 12 मे रोजी पीडीत महिला ही कूलरमध्ये पाणी भरत असतांना शिवाजी नारायण सोनवणे आणि विनोद भास्कर सोनवणे यांनी जोरजोरात शिवीगाळ केली. पीडीत महिलेने दोघांना विचारले की, तुम्ही कुणाला शिवीगाळ करत आहात?. त्यावर दोघांनी पीडीतेला अश्लिल शिवीगाळ करत मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले तसेच पीडीतेला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजी सोनवणे आणि विनोद सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार खुशाल पाटील करीत आहेत.


