वावडदा शिवारात शॉर्ट सर्किटने ऊस पेटला : चार लाखांचे नुकसान


Sugarcane caught fire due to short circuit in Vavadda Shivar : loss of four lakhs जळगाव : वीज तारांमध्ये घर्षण झाल्यानंतर उसाच्या शेतात आग लागून शेतकर्‍याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शनिवार, 13 मे रोजी दुपारी घडली.

शेतकर्‍याने केली भरपाईची मागणी
जळगाव तालुक्यातील वावडदा येथील शेतकरी जानकीराम फकीरा पाटील शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस रसवंतीसाठी वापरला जातो. शनिवारी जानकीराम फकीरा पाटील हे शेतात असताना अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली. या आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला असून जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जानकीराम पाटील यांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !