बेटावद खुर्द येथील महिलेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा
molestation of woman in Betavad Khurd: Crime against both जामनेर : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावातील 35 वर्षीय शेतमजूर महिलेचा रस्ता अडवत दोघांनी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शनिवार, 13 मे रोजी दुपारी तीन वाजता पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
बेटावद खुर्द गावात 35 वर्षीय शेतमजूर महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 13 मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास महिला महादेव मंदिरात दर्शनार्थ जात असताना संशयित परमेश्वर उर्फ छोटू भगवान लुकडे व किरण परमेश्वर लुकडे (दोन्ही रा.बेटावद खुर्द) यांनी महिलेचा रस्ता अडवत मनासारखे वाग, नाही तर तुला सोडणार नाही म्हणत महिलेशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला तसेच महिलेला शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. तपास नाईक योगेश महाजन करीत आहेत.


