स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जळगावच्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा


A case against a Jalgaon bike rider who caused his own death जळगाव : शहरातील नेरी नाक्याजवळल मुस्लिम कब्रस्तान समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आढळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र पूंजू ढाके (58, अयोध्या नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

दुचाकीस्वाराविरोधातच गुन्हा
रवींद्र पुंजू ढाके हे शहरातील अयोध्या नगरात आपल्या परीवारासह वास्तव्याला होते. मंगळवार, 9 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रवींद्र ढाके हे त्यांची दुचाकी (एम.एच.19 बी.पी.9629) ने घरी जात असताना नेरी नाका समोरील मुस्लिम कब्रस्तान समोर त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळताच ढाके गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दुचाकी चालवितांना स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ढाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !