धावत्या रेल्वेखाली अनोळखीची आत्महत्या
पाचोरा : पाचोरा-गाळण रेल्वे स्थानका दरम्यान अनोळखी तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री पावणेदहा वाजता घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
शनिवार, 13 मे रोजी रात्री 9.45 वाजता पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. 369/13/15 नजीक मुंबईहुन लखनौच्या दिशेने जाणार्या 22121 लखनौ ए. सी. एक्सप्रेससमोर येवून 30 वर्षीय अनोळखी तरुणाने झोकून देत आत्महत्या केली. लखनौ एक्सप्रेसच्या लोकोपायलट जे. एस. बुट्टरशाहु यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक यांना वॉकी टॉकी द्वारे माहिती देत घटना कळवली. हवालदार निववृत्ती मोरे हे रुग्णवाहिका चालक दिनेश पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मयत तरुणाचव्या खिश्यात शेंदुर्णी ते पाचोरा असे एस.टी. बस चे तिकीट आढळल्े आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे हे करीत आहे.


