अजिंठा चौकात रीक्षाच्या धडकेत भुसावळातील वृद्धाचा मृत्यू : रीक्षा चालकाविरोधात गुन्हा


जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात प्रवासी रीक्षाने धडक दिल्यानंतर पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी दुपारी एक वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पादचार्‍याच्या मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा
किशनचंद राजलदास बजाज (65, सिंधी कॉलनी, गुरुनानक नगर, भुसावळ) हे वयोवृद्ध आपल्या परीवारासह वास्तव्याला होते. कामाच्या निमित्ताने गुरुवार, 4 मे रोजी सायंकाळी सहा वाजता ते जळगाव शहरात अजिंठा चौफुली येथे आले असता चंदू सॉ मील समोरील रोडवरून पायी जात असताना पाठीमागून येणारी अज्ञात प्रवासी रीक्षाने किशनचंद यांना जोरदार धडक दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा जगदीश किशनचंद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिल्यानंतर शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !