In-charge of seven police stations in Jalgaon district has been changed फैजपूर पोलीस ठाण्याच्या नूतन सहाय्यक निरीक्षकपदी निलेश वाघ तर नशिराबादचे रामेश्वर मोताळे नवे प्रभारी
Nilesh Wagh as the new Assistant Inspector of Faizpur Police Station and Rameshwar Motale as the new in-charge of Nashirabad भुसावळ : जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवारी काढले आहेत.
असे आहेत बदली झालेले अधिकारी
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांची नियंत्रण कक्षात विनंती बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील निलेश नानाजी वाघ बदलून येत आहेत. कासोदा पोलीस ठाण्याच्या प्रभारी निता कायटे यांची एएचटीयु सेलमध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एएचटीयु सेलच्या योगीता मधुकर नारखेडे यांची बदली करण्यात आली आहे. नशिराबादचे अनिल छबू मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमआयडीसीचे रामेश्वर दगडू मोताळे यांची बदली करण्यात आली. रावेरचे शीतलकुमार नाईक यांची मारवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्यांनी तत्काळ पदभार घ्यावा, असेही आदेशात नमूद आहे.
