किरकोळ वाद उफाळला : शेंदुर्णीत कुटूंबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण
जामनेर : घराचे दरवाजा व खिडक्या काढण्याच्या कारणावरून दुसर्या गटातील पाच संशयितांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करीत धमकी दिली. ही घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
आनंदा रतन गुजर (57, रा.प्रभू पुष्पनगर, शेंदुर्णी) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून मंगळवार, 16 मे रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागील भिंतीस असलेले खिडकी व दरवाजा काढू नका या कारणावरून शेजारील लखन विठ्ठल गुजर, मीराबाई विठ्ठल गुजर, राजू भीला गुजर, चेतन राजीव गुजर आणि लताबाई राजू गुजर यांनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने आनंदा गुजर यांच्यासह त्यांच्या घरातील हर्षदा गणेश गुजर, वंदना वसंत गुजर, सीमा संतोष गुजर, चित्रा भरत गुजर, अनिशा भरत गुजर, सुभाष गुजर या सहा जणांना बेदम मारहाण करीत गंभीर दुखापत केली. या प्रकरणी आनंदा रतन गुजर यांनी पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.


