जामनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण
Abduction of minor girl from Jamner taluka जामनेर : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका घडला. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फूस लावून पळवले
जामनेर तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. सोमवार, 15 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. याबाबत पीडित मुलीचा मामा यांनी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जामनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.


