पाळधी गावातून ट्रॅक्टरसह ट्रॉली लांबवली
धरणगाव : धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरसह ट्रॉलीची लांबवली. या संदर्भात सोमवार, 15 मे रोजी रात्री नऊ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
जितेंद्र दत्तू जाधव (31, रा.पाळधी खुर्द, ता.धरणगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करतात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.20 सी.आर. 2056) असून त्यांनी पाळधी गावातील अहमद शेख यांच्या घराजवळ लावले होते. 13 मे ते 14 मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेली. या संदर्भात ट्रॅक्टर मालक जितेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरचा सर्वत्र शोध घेतला परंतु याबाबत कुठेही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवार, 15 मे रोजी रात्री 9 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश रमेश भालेराव करीत आहे.


