सातबारा उतार्यावर बोजा बसवण्यासाठी लाच : पाचोरा तालुक्यातील खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
Bribe to load on Satbara passage : Pachora taluka private punter in ACB’s net पाचोरा : सातबारा उतार्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी एक हजार 360 रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास अटक केली. भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कारवाई बांबरूड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली.
शासकीय काम करून देण्यासाठी मागितली लाच
लासगाव येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असून त्यांनी एक लाख 30 हजारांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उतार्यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) यांनी तक्रारदाराकडे एक हजार 360 रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बांबरूड येथे आरोपीच्या घराजवळ हा सापळा यAdd Newशस्वी करण्यात आला.
मॅजिक रक्कम सांगून मागितली लाच
संशयित हा शासकीय काम करून देण्यासाठी नेहमीच राऊंड फिगर रकमेऐवजी मॅजिक फिगर सांगून रक्कम स्वीकारत होता शिवाय दोन हजार मागितल्यास संबंधित त्यात तडजोड करून एक हजार वा दिड हजार देत असल्याने त्यातील नुकसान टाळण्यासाठी काहीतरी वेगळी रक्कम संशयित सांगत असे. आजच्या सापळ्यातही तक्रारदाराकडे एक हजार 360 रुपयांची रक्कम मागण्यात आली मात्र आरोपी जाळ्यात अडकला. हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक एन.एन.जाधव व सहकार्यांनी सापळा यशस्वी केला.


