भुसावळातील व्यापार्यांना धमकावून खंडणीची मागणी : योगेश मोघे जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Threatening traders in Bhusawal and demanding extortion: Yogesh Moghe in Jalgaon Crime Branch’s net भुसावळ : भुसावळातील दोन व्यापार्यांना हत्याकांडातील आरोपीच्या नावाने धमकावून खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात योगेश उर्फ हिरालाल सोनू मोघे (28, आगवाली चाळ, भुसावळ, ह.मु.हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यास जळगावच्या खोटे नगरातून बुधवारी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
दोन व्यापार्यांकडे मागितली होती खंडणी
शहरातील गोपी मॉलचे रवी झामनानी व गुजराथी स्वीटचे कपिल शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी 1.20 ते दोन वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी मोबाईलवरून फोन लावून भाई बोल रहे म्हणत फोन दिला असता समोरील व्यक्तीने मै राजा मोघे बोल रहा हु, आपको दुकान चलाना है तो मुझे पैसे देना पडेगा. गुजराथी यांच्याकडे दहा हजार व झामनानी यांच्याकडे 20 हजारांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप व्यापार्यांनी केरीत गुन्हा दाखल केला होता
व्यापार्यांनी केली बंदोबस्ताची मागणी
गुजराथी यांनी पैसे नसल्याचे सांगून आलेल्या दोघा पंटरांना मी कोर्टात येत असल्याचे सांगितल्यानंतर संशयित निघून गेले. ही बाब मेहता यांनी शहरातील व्यापार्यांना सांगताच व्यापारी व माजी नगरसेवक निर्मल कोठारी, गुड्डू अग्रवाल, अजय नागराणी, शाम दरगड, रवी झामनानी, विशाल अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, विजय मोहनानी, देवा वाणी, संजय सुराणा, प्रसन्न पांडे आदी व्यापार्यांनी शहर पोलिसात धाव घेत गुन्हेगारंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
जळगावातून एका आरोपीला अटक
गुजराथी स्वीट मार्टचे कपिल गुजराथी यांना फोनवर धमकावून दहा हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या योगेश उर्फ हिरालाल सोनू मोघे (28, आगवाली चाळ, भुसावळ, ह.मु.हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यास जळगावच्या खोटे नगरातील बुधवारी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
यांनी आवळल्या मुसक्या
गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रवी नरवाडे, संदीप सावळे, रणजीत जाधव, कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने आरोपीला अटक करीत अधिक कारवाईसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संशयित योगेश मोघेच्या अटकेनंतर व्यापार्यांकडे जावून खंडणी मागणारे संशयितदेखील लवकरच जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे तर हत्याकांडातील संशयित कुणाच्या फोनवरून बोलला वा बोललाच नाही ते देखील स्पष्ट होणार आहे.
