चाळीसगाव तालुक्यातील ‘या’ गावात झाली धाडसी घरफोडी


Lakhs instead of lakhs in daring house burglary in Borkheda चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथील एका मजूराच्या घराचा कडीकोंडा तोडून कपाटातून रोकडसह एक लाखांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. बोरखेडा खुर्द येथील दिलीप निंबा पाटील (43) हे मजूरी करून कुटुंबांची उपजीविका भागवतात.

मध्यरात्री केली चोरी
पाटील कुटुंब हे मंगळवारी सायंकाळी जेवण घेऊन घराच्या छतावर झोपण्यासाठी गेल्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास दिलीप पाटील यांच्या पत्नी यांना घराचा कडीकोंडा तुटलेला व घरातील सामान अस्ताव्यस्त पडला दिसून आाल. कपाटाची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये रोकड व सोन्याचे दागदागिणे असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !