डिकसाईजवळ दुचाकी अपघात : 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जळगाव जळगाव तालुक्यातील डीकसाई गावाजवळ भरधाव वेगाने येणार्या दुचाकीने दिलेल्या धडकेत पायी जाणार्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा दुचाकीधारकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजू उर्फ पिंटू दोधू पाटील (40, रा.डिकसाई, ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
राजू पाटील हा तरुण सोमवार, 15 मे रोजी रात्री आठ वाजता विदगाव येथून डिकसाईकडे पायी जाण्यासाठी निघाला असता रस्त्यावरील जोशी आण्णा यांच्या शेतासमोरून जात असताना मागून येणारी दुचाकी (एम.एच.19 ए.एल.2979) जोरदार धडक दिल्याने राजू पाटील ठार झाला. अपघात प्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रदीप सज्जन चव्हाण (डिकसाई, ता.जळगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार समाधान संजय नाईक (डिकसाई) याच्याविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.


