धुळ्यात पतसंस्थेच्या रोखपालानेच लांबवले 21 लाखांचे दागिणे


धुळे  शहरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतील रोखपालानेच तारण ठेवलेल्या सुमारे 21 लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी देवपूरातील नेहरू चौकातील दिनेश कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र वसंतराव खानकरी (68, रा.शारदा नगर, देवपूर) यांनी देवपूर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर संशयित शालिग्राम सुभाष योगेश्वर (रा.श्रीकृष्ण मंदिराशेजारी, देवपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लॉकरमधील ऐवजावर डल्ला
पतसंस्थेच्या कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवलेली पतसंस्थेची जंगम मालमत्ता व तारण असलेली साडेसहा लाखांचे 10 ग्रॅम वजनाचे 12 व प्रत्येकी 5 ग्रॅमच्या दोन सुवर्णमुद्रा व 15 लाख 25 हजार 310 रुपये किंमतीच्या 35 ग्रॅमच्या दोन हिरे जडीत बांगड्या, 29.200 ग्रॅमचे चार हिरे जडीत नेकलेस, 68.300 ग्रॅमचा हिरे जडीत नेकलेस सेट, 53.800 ग्रॅमचा हिरे जडीत हारसेट कानातील झुमक्यांसह असे एकूण 289 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे पतसंस्थेत रोखपाल म्हणून नोकरीस असलेला शालिग्राम सुभाष योगेश्वर (रा.श्रीकृष्ण मंदिराशेजारी, देवपूर) याने अपहार व फसवणूक करीत लांबवल्याचा आरोप आहे. तपास उपनिरीक्षक इंदवे करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !