मेकअप करण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन लांबवली : कोळवद गावात खळबळ


Gold chains extended on the pretext of make-up : Excitement in Kolwad village यावल : तालुक्यातील कोळवद येथे नातेवाईकांकडे आलेल्या तरुणीची चैन मेकअप करण्याच्या बहाण्याने अज्ञात महिलेने लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात महिलेचा कसून शोध
कोळवद येथे प्रवीण विठ्ठल कोळी यांच्या राहत्या घरात स्नेहल रामदास कोळी (21, रा.मोहाडी नगर, जळगाव) ही तरुणी आली होती. तिचा मेकअप करण्याच्या बहाण्याने एका अज्ञात महिलेने तिच्या गळ्यात असलेली 12 ग्रॅम वजनाची व 25 हजार रुपये किंमतीची चैन लांबवली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !