satish khare suspend नाशिकमधील लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे अखेर निलंबित


Satish Khare, the corrupt district deputy registrar in Nashik, has finally been suspended नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संचालकपदी निवडून आल्यानंतरही त्यांच्या निवडीविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी 30 लाख रुपयांच्या लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (57, फ्लॅट नंबर 201, आई हाईट्स, कॉलेज रोड, नाशिक) व खाजगी हस्तक तथा वकील शैलेश सुमातीलाल साबद्रा (32, फ्लॅट नं 4, उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांना नाशिक एसीबीने अटक केली होती. लाचखोर सतीश खरे सापळ्यात अडकल्यानंतर अहवाल प्राप्त होताच शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी खरे याचे निलंबन केले आहे.

कारवाईने उडाली खळबळ
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडीविरुद्ध प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेतली होती. त्यावर खरे याच्याकडे सुनावणी सुरू होती. तक्रारदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी खरे याने अ‍ॅड.शैलेश साबद्रा यांच्यामार्फत 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र लाचेत साबद्रा यांना टक्केवारी द्यावी लागणार असल्याने खरे याने थेट तक्रारदाराकडेच लाचेची मागणी केली आणि त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. यानंतर 30 लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने खरे यास रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली होती. आरोपी खरे सध्या पोलीस कोठडीत आत्तापर्यंत अनेक बेहिशोबी मालमत्ता जप्त कण्यात आली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !