सावदा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाज मेळाव्यात दहा जोडपी विवाहबद्ध
सावदा येथे आदिवासी सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सावदा : आदिवासी सेवा मंडळातर्फे आयोजीत आदिवासी तडवी भिल्ल जमातीच्या 26 व्या सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडपी विवाहबद्ध झाली. अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. विशेष अतिथी म्हणून प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, मुंबई शिक्षणाधिकारी राजु अमीर साहेब, आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी विनीता सोनवणे होत्या. राजेश वानखेडे, विवेक ठाकरे, अनिल शावखा, माजी नगराध्यक्षा नजमा इरफान तडवी, आशा रफीक (नाशिक), नंदा लोखंडे यांची ही मेळाव्यास उपस्थिती होती. सूत्रसंचालन सलीम सर व अनिल गुरूजी यांनी केले. प्रास्ताविक आसेमं संस्थापक राजू बिर्हाम यांनी केले. याप्रसंगी समाज जोडो पदयात्रेकरूनचा जंगी सत्कार करण्यात आला. तडवी संस्कृती जतनसाठी निवडा शॉर्ट फिल्मच्या कवी /कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
सामूहिक विवाह सोहळ्यांची गरज : आमदार
समाजाला आज सामूहिक विवाह सोहळ्यांची गरज असून युवा पिढीने आपले विवाह अश्याच ठिकाणी करावेत, आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले. विनीता सोनवणे म्हणाल्या की, आदिवासी समाजाने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला विकास घडवावा. राजू अमीर साहेब यांनी एक हजार 820 जोडप्यांचा सत्कार करण्याकरीता आसेमं परीवार महामेळावा आयोजित करणार असल्याचे सांगितले. प्रसंगी संजू जमादार, हनीफ अप्पा, रोशन हसन, मनोज जमशेर, शरीफ आझाद, हाजी रमजान अमीर, फकिरा सिकंदर, अनवर भिकारी (नाशिक), रमजान शालम, कामील शेठ, राजु इब्राहिम साहेब, सत्तार दादा (दहिगाव), हसन जमादार, मजित अप्पा, मासुम भाई, राजू चौधरी, मुस्ताक भाई (मुंबई), सै.अजगर, मुबारक फत्तु, जे.के.शेठ, शरीफ मासुम, सुभान समशेर (वडगाव), अशपाक जलदार आदींनी मेळाव्यासाठी सहकाय केले.. स्थानिक आसेमं युवा कमेटीचे मोहसीन राजू, गुडा हुसेन, हैदर अकबर, वसीम राजू, अशफाक युनूस, शेरू सायबू, आशिष राजु, पिंटु बाबू, जुनेद साबीर, समीर मयबु, राहुल बडगे, बाबा मोमीन, राजीब मोमीन, आवेश सर्फराज, अर्शद अबजल,अजय मेढे, रफीक सलीम, रोशन नबाब आदींनी परीश्रम घेतले.

