रावेर बाजार समिती सभापतीपदी योगेश पाटील बिनविरोध
Yogesh Patil unopposed for the post of Raver Bazar Committee Chairman रावेर : रावेर बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे सचिन पाटील तर उपसभापती पदी काँग्रेसचे योगेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सभापती पदाची प्रथम संधी राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाले होते मात्र राजेंद्र चौधरी व सचिन पाटील यांच्यात रस्सीखेच वाढल्यानंतर हा तिढा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोडवत सचिन पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार शिरीष चौधरी यांनी सभापती व उपसभापतींचे शाल बुके देऊन अभिनंदन केले.
यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
सभापती व उपसभापती पदासाठी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी सभापती पदासाठी सचिन पाटील तर उपसभापती पदासाठी योगेश पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची या पदांवर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सभेला डॉ.राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, पितांबर पाटील, गणेश महाजन, सय्यद असगर, रोहित अग्रवाल, विलास चौधरी, मनीषा पाटील, सविता पाटील, पंकज पाटील, जयेश कुयटे, सिकंदर तडवी उपस्थित होते. निवडीनंतर जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, किशोर पाटील, प्रवीण पंडित यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे अभिनंदन केले.

