जळगावच्या पार्वती नगरात धाडसी घरफोडी : चार लाखांचा ऐवज लंपास


जळगाव : शहरातील पार्वती नगरातील एका अपार्टमेंटमधील बंद प्लॅटमधून सोन्याचे दागिण्यांसह रोकड मिळून चार लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी बुधवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
स्नेहल सौरभ फडके (38, रा.पार्वती नगर, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 14 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या खाजगी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीचे ताट, समई, निरंजनी, चांदीचे शिक्के, कॅमेरा आणि रोकड असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. स्नेहल फडके या बुधवारी दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !