जळगावच्या भोईटे गल्लीत घरफोडी : 70 हजारांचा ऐवज लंपास


Burglary in Jalgaon’s Bhoite Galli : 70 thousand compensation जळगाव : शाहूनगरातील भोईटे गल्लीत बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 70 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
जळगाव शहरातील शाहू नगरातील भोईटे गल्लीत शरीफ मोहम्मद भिस्ती हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. वरच्या मजल्यावर त्यांचा मोठा भाऊ वास्तव्यास आसून शुक्रवार, 5 मे रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता मंगळवार, 16 मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भिस्ती यांचा भाचा ईरशाद गुलाम भिस्ती याचा त्यांना फोन आला व त्याने तुमच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. भिस्ती यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ईरशाद हा गेला असता त्याला कपाटात ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी शरीफ भिस्ती यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उमेश भांडारकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !