जळगावातील हद्दपार आरोपीची सुर्याच्या धाकावर दहशत : यंत्रणेने ठोकल्या बेड्या
Deported accused in Jalgaon net जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हद्दपार असतानाही आदेश डावलून शहरात आलेल्या सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड (24, रा.मच्छी बाजार, सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनीतून धारदार सुर्यास अटक केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठज्ञण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धारदार सुरा जप्त
शहरातील सुप्रिम कॉलनी परीसरातील रामदेव बाबा मंदीराच्या परीसरात संशयित आरोपी हा हातात लोखंडी धारदार सुरा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी रात्री 10 वाजता सापळा रचून सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.


