जळगावात धूम स्टाईल नागरीकांचे मोबाईल लांबवले : आरोपी अखेर जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
In Jalgaon Dhoom style cellphones of citizens were stolen : Accused finally in the net of Jalgaon Crime Branch जळगाव : जळगावात धूम स्टाईल मोबाईल चोरी करणार्या संशयिताच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. राहुल रानु देखनाळे (24, मूळ रा.तांबापुरा, जळगाव, ह.मु.उमेश पार्क मोहाडी परीसर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून एलसीबीची कारवाई
आरोपीकडे चोरीचे मोबाईल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना कळताच त्यांनी पथकाला सूचना केल्या. पोलीस अंमलदार विजयसिंग धनसिंग पाटील, सुधाकर रामदास अंभोरे, जितेंद्र राजाराम पाटील, अकरम याकुब शेख, महेश आत्माराम महाजन, नितीन प्रकाश बाविस्कर, प्रीतम पिंतांबर पाटील, विजय शामराव पाटील, संदीप श्रावण सावळे, ईश्वर पंडीत पाटील, उमेशगिरी गोसावी आदींनी आरोपीला अटक केली. आरोपी आपल्या सहकार्याच्या मदतीने धूम स्टाईल येत जळगाव शहरातून पाच ते सात महिन्यापुर्वी पायी चालणार्या नागरीकांच्या हातातील मोबाईल लांबवल्याची कबुली दिली. आरोपीला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.


