भुसावळात लग्नासाठी आलेल्या चोपड्यातील प्रौढाचा उष्माघाताने मृत्यू


An adult from Chopda, who had come to get married in Bhusawal, died of heat stroke यावल : भुसावळ येथून लग्न आटोपून पत्नी व मुलासह यावलमार्गे चोपडा शहराकडे निघालेल्या प्रौढाला उन्हाचा फटका बसताच मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी यावल शहराबाहेरील पाटचारीजवळ घडली. उन्हाचा फटका बसताच दुचाकीस्वार कोसळल्याने महिलासह मुलगा जखमी झाला तर दुचाकीस्वाराचा मात्र जागीच मृत्यू कोसळला. राजू बशीर पिंजारी (57, रा. फुलेनगर, चोपडा) असे मृताचे नाव आहे.

उन्हाचा फटका बसताच दुचाकीस्वार कुटूंबासह कोसळला
पिंजारी हे पत्नी रूक्शानाबी राजु पिंजारी (52), मुलगा मुक्तार राजु पिंजारी (16) हे तिघे दुचाकीद्वारे यावलमार्गे चोपडा जात असताना गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान यावल शहराजवळील पाटचारीजवळ राजु पिंजारी यांना उन्हाचा त्यांना फटका बसला आणि चक्कर येऊन ते चालत्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला कोसळले. त्यात दुचाकीचा अपघात होवून पिंजारी हे बेशुद्ध झाले तर महिला व मुलगा जखमी झाले.

जागीच ओढवला मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावरून 108 वाहनाद्वारे तिघांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात डॉ.इरफान खान, डॉ. प्रशांत जावळे, अधिपरीचारक जॉन्सन सोरटे, कादर तडवी आदींनी उपचार केले. दरम्यान राजू बशीर पिंजारी यांचा जागीच मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. जखमी असलेल्या रुक्सनाबी व मुक्तार पिंजारी या दोघांना चोपडा येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली जात होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !