यावल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक : आज तासाभरात समोर येणार निकाल


यावल : यावल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागांकरीत पोटनिवडणूक गुरुवारी झाली. त्यात 71.65 टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी 10 वाजेला यावल तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे.

यावल तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक झाली.

तासाभरात येणार निकाल
पाच मतदान केंद्रावर सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. कासवा ग्रामपंचायतीच्या 1 जागे करीता 3 उमेदवार रिंगणात असुन येथे 81.66 टक्के मतदान झाले, बामणोद एका जागेकरीता दोन उमेदवार रिंगणात असुन येथे 71.04 टक्के मतदान झाले. बोरखेडा बुद्रुक एका जागेकरीता 2 उमेदवार रिंगणात असुन येथे 78.77 टक्के मतदान झाले. मारूळ एका जागेकरीता दोन उमेदवार असून येथे 72.93 टक्के मतदान झाले व दहिगावला एका जागेकरीता 3 उमेदवार असून येथे 61.71 टक्के मतदान झाले. शुक्रवारी तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जगताप, बबीता चौधरी, एच.एम.तडवी, जी.टी.सोनवणे, सुयोग पाटील, स्मिता कोळी, प्रविण पाटील, विलास नागरे, टी.सी.बारेला यांच्या वतीने मतमोजणी केली जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !